स्वाभीमानाचा "कणा"
देवा... घेऊन निसर्गाचे शस्त्र कर कितीही वार आमच्यावरी....! आता घाबरणार नाही जगाचा पोशिंदा मी आहे... हाडाचा शेतकरी....!! देवा सवय जुनीच तुझी आपल्याच भक्ताची पहण्याची नेहमी परिक्षा .....! परिक्षेत पास होऊदे अथावा नापास देतोस नेहमी तू इथं भक्तासच शिक्षा ....!! देवा विसरलास का?...कितीतरी वेळा...; माझ्या प्रयत्न अन् जिद्दीच्या शस्रानं, तुझ्या संकटसैनीकांना पायावर झुकवलय.....! ना वाचले ग्ंथपुराण मातीतून उभा राहता येत , हे मला माझ्या शेतातील बियांनी शिकवलय.....!! देवा हारेन कदाची मी लढता लढता पण सोडणार नाही लढाऊ बाणा.......! कदाचित होईन जमिनदोस्त पुन्हा मी पण मोडणार नाही स्वाभीमानाचा "कणा."......!!