पडतोय दुष्काळ
सत्ययुग गेल आता कलीयुग आलं.... दुनियेच गणित समंद इथं उलट झालं... जिन्स घालतय म्हातार बाब धोतार नेसतय बाळ म्हणून पडतोया दुष्काळर बाबा पडतोया दुष्काळ ... या निसर्गाचीबी कमाल न्यारी.... काय सांगांव कधी बिघडेल स्वारी.... पावसाळ्यात झळा उन्हाच्या..ऊन्हाळ्यात दाटं आभाळ.... पडतोया दुष्काळ ..... देवा दिकाचा तुटला आधार.... मांडीला त्यांचाबी इथं बाजार..... पुजारी फोडीतो हाडक खुंटीला टांगून माळ..... पडतोया दुष्काळ ..... नर बिघडले होती आधीच आता बिघडून गेली नार... कलियुगाच आंगात तिच्या आता शीरलय भलतच वारं...... फँशनच्या नावाखाली घालते पोरगी आंगावर कपड्याच जाळं....... पडतोया दुष्काळ ..... सांगा काय शिकतीय शाळत पोर... बाई आन् मास्तरचा रोमांन्स त्यांच्या समोर.... बाई गुंतली पोरामंदी आन् मास्तरच पोरीशी चाळं...... पडतोया दुष्काळ ..... पडतोया दुष्काळ ......