top of page

नशिबावरच सट्टा

नशिब आमचे मांडते रोज इथं आमची थट्टा .... आम्ही पण जुगारी पक्के लावतो रोज नशिबावरच सट्टा... दरवर्षी काढून कर्ज पुरतो मातीत दाणं.....ना साथ निसर्गाची ना पक्क पावासाचा येणं.... तरीसुद्धा नाही लावला कधी हिमतीला बट्टा...... .... लावतो रोज नशिबावर सट्टा.... पेट्रोल वाढल डिझेल वाढल वाढला चांदी अन् सोनं...... गाड्या वाढल्या मोबाईल वाढले तरीही तुम्ही घेता आनंदानं .,... वाढला शेतीचा माल तर तुमच्या अंगावर येतो काटा..... .... लावतो नशिबावरच सट्टा..... नावाचच मालक आम्ही बाकी सार बँकेत तारण....भिती कशाची आम्हा रोजच उशाशी मरण..... काय नेम कधी बनेल रस्सी गळ्याची ह्यो डोईवरचा फेटा..... लावतो रोज नशिबावरच सट्टा

bottom of page