top of page

तुझ्या काळजाचे दार

उघड की रे देवा आता , तुझ्या काळजाचे दार......! तुला भेटण्यासाठी देवा, मी कष्ट घेतले हे फार......!! मंदिरात आलो तुझ्या, पण गाभाऱ्यात नाही गेलो....! मंदिराबाहेर पाहुन तुला देवा मी धन्य धन्य झालो.......!! गरीबांना नाही वाली इथं नाही म्हाताऱ्या कोतार्यांना आधार......! माणुसकी हीच खरी भक्ती देवा , तुझ्या भक्ताला हे कधी कळणार.......!! बोलुन एखाद नवस देवा इथं तुला पण देतो आम्ही लाच....! हे सगळ करताना का ? नाही वाटत आम्हाला आमचीच लाज........!! सोड येड्या उपास तापास आता, मायबापा कोंडून घरी करणे पंढरीची वारी...... ! सांग कस कळना तुला माणसा , खरा देव नांदतो मायबाप ,अनाथांच्या अंतरी....!!

bottom of page