top of page

चाक 'नशिबा'च

किती फिरवतो चाक 'नशिबा'च, तरी 'सरळ' फिरता फिरना --- किती मारतो औषध 'प्रयत्नाचं', किडं 'दुःखाची' मरता मरनां --- किती घेतोया घास मोठा तरी 'दुःख' सरता सरना------ किती खातोया घास टोचून तरी 'सुखं 'पुरता पुरना ------ किती धावायाचं दिनरात तरी रस्ता, 'आयुष्याचा' ओसरता ओसरेना------ किती पेटवू कंदील अंधारात 'दुःखाच्या', उजेड 'सुखाचा' पसरता पसरेना----- आम्हीपण झालो आता देवा तालमीत दुनियेच्या तयार..... तयार झेलायला आता आम्ही मनगटावरती हे नियतीचे वारं.....

bottom of page