top of page

काटेरी वाटा

आठवता दिस जूनं येतो, आंगावरी अजूनही काटा..... फाटक्या चड्डीत तुडवायचो, आणवानी काटेरी वाटा...... फुटकी ती पाटी अन् ते , जून्या बादीच फाटकच पुस्तक..... फाटक्याच टोपीन , झाकायचो उजाड मस्तक.... जवा पेटवायची माय माझी चूल सांगू आनंद व्हायचा किती वेड्या मनां..... वाटायाच.... सुटणार उपवास दोन दिसाचा मिळणार या पोटास जेवण आज पुन्हा .....

bottom of page